विदर्भ

वाशिम ९७.५६ टक्के, तर मानोरा बाजार समितीसाठी ९५ टक्के चुरशीने मतदान

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील वाशीम, मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदासाठी आज (दि.२८) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी ८ वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९७.५६ टक्के मतदान झाले. तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ९५ टक्के मतदान झाले.

वाशिम आणि मानोरा बाजार समिती संचालक पदाच्या ३६ जागेसाठी ११३ उमेदवाराचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. शनिवारी (दि. २९) सकाळी ८ पासून मतमोजणी होणार आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT