वर्धा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी लॅपटॉपसह प्रिंटर तसेच दोन लाख १४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील चार जणांना अटक केल्यानंतर एकास दिल्ली तर एकास इंदोर येथून अशी सहा जणांना अटक करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार दिनेश तुमाने यांना १६ मार्च रोजी काही इसम बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत बनावट जोटा जप्त करून अटक केली. याबाबत तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी निखील लोणारे, रा. बोरगाव (मेघे), स्वप्निल उमाटे, प्रितम हिवरे, साहील साखरकर तिघेही रा. पवनार. या चौघांना अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ९४ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी या चौघांसोबतच दिल्ली येथून अंकुश कुमार मनोज कुमार तसेच इंदोर येथून ओमप्रकाश भगवान लालवाणी यास अटक करण्यात आली.
गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडून ८ मोबाईल, १ लॅपटॉप, २ कलर प्रिंन्टर असे साहित्य, दोन लाख १४ हजार रुपयांच्या ५०० रुपये किमतीच्या ४२८ नोटा जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशान्वये पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, दिनेश तुमाने, जगदीश गराड, अनुप राऊत, राहुल भोयर, नितीन ईटकर, सी.आय.यु. युनिटचे प्रमुख संदीप कापडे, विशाल मडावी, अंकीत जिभे यांनी केली.
गुन्ह्याच्या तपासात आरोपींना दिल्ली येथील राज नावाच्या व्यक्तीने ५० हजार रुपयांत १ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अंकुश कुमार मनोज कुमार, रा. बुलंदशहर (उ.प्र.) यास दिल्ली येथुन अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून १,१०,००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अंकुश कुमार मनोज कुमार यास ओमप्रकाश भगवान लालवानी, रा. इंदोर (म.प्र) याने बनावट नोटा पुरविल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ओमप्रकाश भगवान लालवानी रा. इंदोर (म.प्र) यास इंदोर येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली. गुन्ह्याचा छडा लावणार्या पोलीस चमुला ५० हजार रुपयांचा रिवॉर्ड पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी जाहीर केला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.