वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा पोलिसांकडून जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशनसह विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ५९७ वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच सात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या सात, मोटारवाहन कायद्यांतर्गत ७४ केसेस करण्यात आल्यात.
पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा, १९ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीसांनी २२ जुलै रोजी रात्री ८ वाजतापासून २३ जुलैच्या पहाटे ४ वाजतापर्यंत नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी अवैध दारू, गांजा, अंमली पदार्थ, जनावरे आदी विक्री, वाहतूक, उत्पादन बाळगणे यावर प्रतिबंध घालण्यासंबंधाने कारवाई तसेच मोटर वाहन कायदयान्वये विविध कलमान्वये वाहन चालकावर, मालकावर कारवाई, ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या कसेसे करण्यात आल्यात. चोरी, जबरी चोरी, दरोडा यावर आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशीटर, सराईत गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. ही मोहीम एकत्रीतरित्या वर्धा जिल्हा पोलिसांतर्फे राबविण्यात आली.
१९ पोलीस स्टेशन अंतर्गत तसेच स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीसांनी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन विशेष मोहीमेदरम्यान २८ पोलीस अधिकारी, १६० पोलीस अंमलदार, ६४ गृहरक्षक असे मनुष्यबळ लावण्यात आले. २० दारुबंदी कायद्यान्वये केसेस, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत ७ केसेस, लहान, मोठी ५९७ वाहने तपासण्यात आली. मोटार वाहन कायदयांतर्गत ७४ केसेस करण्यात आल्या आहे. अचानक राबविलेल्या या मोहिमेने गुन्हेगारांना धडकी भरली. यापुढेही अशा मोहीम राबवून प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे.