विदर्भ

Agniveer Army Recruitment : अग्नीवीर सैन्यभरती मेळावा १० जूनपासून

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे 10 ते 17 जून या कालावधीत अग्नीवीर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल 20 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात येणार आहे. आपले सरकार केंद्राच्या मदतीने येणा-या उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, लोकल मिलिटरी अथॅारिटी जीआरसी कामठीचे ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT