Youth Dead Body found Washim Pudhari
वाशिम

Washim Youth Death | विहिरीत युवकाचा मृतदेह सापडल्याने बेंबळा गावात खळबळ

बेंबळा गावाजवळील शेतातील विहिरीत एक युवक पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास

पुढारी वृत्तसेवा

Youth Dead Body found Washim

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील बेंबळा येथील शेतशिवारातील एका विहिरीत २० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवीण मधुकर गुरेकर (वय २०) असे मृत युवकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंबळा गावाजवळील शेतातील विहिरीत एक युवक पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ धनज पोलिसांना कळवले. माहिती मिळताच धनज पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात, आत्महत्या की इतर कोणते कारण आहे, याबाबत धनज पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे बेंबळा गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT