वाशिम : चारचाकी गाडी घेण्यासाठी वडिलाकडून ५ लाख रूपये आण, असा सतत तगादा लावून मेघा ऊर्फ रेवती शिंदे या विवाहितेची पतीसह सासू-सासऱ्यांनी धारदार शस्राने हत्या केली होती. याप्रकरणी मंगळवारी (दि.१८) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पत्नीच्या हत्येप्रकरणी पती व सासू- सासऱ्याला दोषी ठरवत पतीला जन्मठेपेची तर सासू सासऱ्याना आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
मेघा ऊर्फ रेवती शिंदे हिचा पती गजानन बबन शिदे हा शारीरिक व मानसिक छळ करत होता. सासू - सासरेही तिचा जाच करत होते. यादरम्यान गजानन याने पत्नी मेघा हिला चारचाकी गाडी घेण्यासाठी वडिलांकडून ५ लाख रूपये घेऊन ये, असा तगादा लावला. तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात तिची धारदार शस्राने हत्या केली. यामध्ये त्याला आई- वडिलाने मदत केली. त्यानंतर तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिघांना दोषी ठरवत पतीला जन्मठेप व सासू-सासऱ्यांना सासू - सासऱ्यांना आठ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.