वाशिम : स्थानिक मधुबन पार्क वारको सिटीजवळ शासनमान्य अकृषक लेआउटमध्ये मागील 4 ते 5 वर्षापासून लोक राहत आहेत, मात्र त्यांना अद्याप नगर परिषदेकडून पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले नाही. याबाबत नागरीकांनी मुख्याधिकारी यांचेकडे बरेच वेळा संपर्क केला, अर्ज केले, मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. या त्रासाला कंटाळून महिलांनी वाशीम जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनमध्ये असे नमूद केले की, वारको सिटी कडे नगर परिषदेचे अक्ष्यम दुर्लक्ष दिसून येते, सद्यस्थितीत सदर कॉलनीमध्ये अंतर्गत पाईपलाईन झालेली आहे, मात्र त्याची 150 ते 200 फुटावर असलेल्या नगर परिषदेच्या मुख्य पाईपलाइनला जोडणी केली गेली नाही. त्याकरीता मधुबन पार्क वारको सिटीजवळ वाशिम येथील महिलांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरीता निवेदन सादर केले. नगर परिषद आता तरी याकडे लक्ष देवून पाईपलाईन जोडणी करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.