Girl Injured in Washim
वाशिम : वाशिम च्या ब्राह्मणवाडा शेतशिवारात वडिलांसोबत तुषार सिंचनाचे पाईप बदलण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर रानडुकारने हल्ला करून गंभीर जखमी केली. ही घटना आज (दि.१७) सकाळी ११ च्या दरम्यान घडली. कविता केशव आढाव (वय १४) असे जखमी मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कविता आज सकाळी वडिलासोबत तुषार सिंचनचे (स्प्रिंकलर) पाईप बदल्यासाठी सकाळी शेतात गेली होती. दरम्यान, पाईप बदलत असताना गव्हात दडून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात रानडुकराने मुलीच्या पोटावर गंभीर दुखापत केली. मुलीला तत्काळ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.