प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
वाशिम

वाशिम : डोक्यात दगड घालून मुलाकडून वडिलांचा खून

Washim Murder Case | लोणी बु.गावात हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी बु.गावात आज (दि. 8) दुपारी 1:30 वाजता हृदयद्रावक घटना घडली. पोटच्या मुलानेच आपल्या 67 वर्षीय वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव निवृत्ती नरवाडे असून. वडिलांवार वार करणारा मुलगा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. वडील मृत झाल्यानंतर मुलगा गणेश नरवाडे मृतदेहा जवळच बसून होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, रिसोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT