Samruddhi Highway Accident :
वाशिम : अजय ढवळे
समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात म्यानमार देशातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना डव्हा-जुऊळका दरम्यान, लोकेशन क्रमांक २३२.३०० येथे काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिन ऑग (वय 33), मिन चित ऑग (वय 13) असे मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. कारमध्ये एकूण ७ प्रवासी होते. ते मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनाला इनोव्हा (क्र. MH01BB1215) कारने जात होते. डव्हा जुऊळका दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक एवढी प्रचंड होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय वॉशिंग येथे उपचार सुरु आहेत.