Washim highway accident news Pudhari
वाशिम

Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आई-वडील गंभीर, दीड वर्षांचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

भरधाव वेगातील कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

Washim highway accident news

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रविवारी (दि. 12) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातात कारचालक श्याम देशमुख (वय 42) आणि त्यांची पत्नी जयश्री देशमुख (वय 38) गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका तीव्र होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्याम देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तसेच जयश्री देशमुख यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

देशमुख कुटुंब मुंबईहून अमरावतीकडे जात असताना हा अपघात घडला. अमरावती शहर अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या नागपूर लेनवर दोनद ते खरडगाव दरम्यान हा अपघात झाला.

मात्र, या भीषण घटनेत एक दिलासा देणारी बाब म्हणजे कारमध्ये असलेले दीड वर्षांचे चिमुकले बाळ चमत्कारिकरित्या सुखरूप बचावले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, बाळाच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT