वाशीम : रिसोड-वाशीम मार्गांवर वानोजा फाट्याजवळ दि. 19 आगस्ट रोजी रात्री 8:30 वाजता दरम्यान झालेल्या भीषण रस्ते अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडील मो. परवेज अन्वर अली शेख वय 57 व मुलगा मो. आकिब शेख वय 24 दोघेही राहणार वाशीम, ह. मु. मुंब्रा (मुंबई) हे रिसोड वरुन आपल्या जावायला भेटून परत वाशीम कडे येत होते. यावेळी समोर धावत असलेल्या वाहनाने आडवे आलेल्या दोन हरणाना धडक दिली. ही धडक बघून मुलाचे दुचाकी वरील संतुलन गेले. समोर धावत असलेल्या ट्रक ला पाठीमागून जबर धडक दिली.
ही धडक एवढी जबर होती की, धडकेत बाप- मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे.