Washim Crime  
वाशिम

Washim Crime | स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धडक कारवाई

कारवाईमुळे सट्टा रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये खळबळ

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : वाशीम स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर सट्टा व्यवसायावर मोठी धडक कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे सट्टा रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांचे आदेशानुसार अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याची धडक मोहिम सुरू असुन त्या अनुषंगाने दि.०४/०५/२०२६ रोजी कारंजा शहर येथे काही इसम IPL मधील लखनउ विरूध्द मुंबई इंडीयंस या क्रिकेट मॅचवर सट्टा लावुन पैशाने हारजीत करीत असल्याबाबतची खात्रीलायक गुप्तबातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास प्राप्त झाली. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे वाशिम यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. वाशिम यांनी एक पथक तयार करून कारवाहीकामी कारंजा येथे रवाना केले.

त्यानुसार पथकाने पो.स्टे. कारंजा शहर हद्दीतील द्वारका कॉलनी सिंधीकॅम्प कारंजा येथे मिळालेल्या माहिती प्रमाणे छापा टाकला असता एका बंद खोली मध्ये सोपाण अशोक लोणागरे वय-३२ वर्ष रा. वार्ड नं.१ पिंजर ता. बार्शीटाकळी जि.अकोला त्‍याच्यासहीत इतर तिघे ज्यामध्ये ६ मोबाईल, १ टॅब, १ मोटार सायकल व रोख रक्कम असा एकुण १,३३,४१०/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यांचेवर पो.स्टे. कारंजा शहर येथे कायदेशिर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील (भापोसे) यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, पो.नि.प्रदिप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पो.उप.नि.शेखर मास्कर व स्था.गु.शा. टिमने अथक परिश्रम करून केली आहे. जिल्ह्यात अवैध कृत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. तसेच नागरीकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशिर हालचालींबाबत त्वरीत पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे, शाखा वाशिम यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT