Washim illegal immigrants
वाशिम : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत.
या अनुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांच्या आदेशाने पोलीस तपासणी केली असता जिल्ह्यात सहा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये सापडली आहे.
त्यानुसार पोलीस आता वाशीम जिल्ह्यात या नागरिकांचा शोध घेत असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून गृहमंत्रालयाला माहिती दिली जाणार असल्याचे वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुश तारे यांनी सांगितले. तर याशिवाय काही पाकिस्तानी नागरिक अनधिकृतरीत्या जिल्ह्यात आहेत का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.