वाशिम

वाशिम : कारंजा ते यवतमाळ मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई; अवैध ३ लाखांची रोकड जप्त

backup backup

वाशीम; अजय ढवळे : कारंजा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कारंजा ते यवतमाळ मार्गावरली सोमठाना येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने एका वाहनावर कारवाई केली आहे. वाहनाची तपासणी करून अवैधरित्या रोख रक्कम, दारू आणि काही वस्तू जप्त केल्या आहेत.

याबाबतची माहिती अशी की,  आज (दि. १ एप्रिल) दुपारी ३ च्या सुमारास यवतमाळकडून येणाऱ्या एका वाहनाची (एमएच २९ बीव्ही १८२१) तपासणी करण्यात आली. जाकीर उल्ला खान (रा. कारंजा जि. वाशिम) व नजीम उल्ला खान आताऊल्ला खान (रा. नेर ता. जि.यवतमाळ) यांच्याजवळ लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये ३ लाख ६३ हजार इतकी रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावा आढळला नाही. सदर रक्कम ए. आर. खान एचपी पेट्रोल पंप यांची वसुली कॅश असल्याचे सांगण्यात आले. कार्यवाही पथक प्रमुख एस एस मिसाळ व इतर तीन यांनी ही रक्कम जप्त करून पुढील कारवाई करिता सदर रक्कम ठाणेदार प्रवीण खंडारे ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा यांच्या ताब्यात देण्यात आली.

उपरोक्त कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी एस., सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सोमठाना येथील स्थिर सर्वेक्षण पथकातील स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य प्रथक प्रमुख संतोष मिसाळ, धनंजय चौधरी, संजय राठोड व एएसआय. व्हि.उ.महाकाळ पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT