pudhari photo
वाशिम

Washim News : वाशिममध्ये घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी सर्रास वापर; प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष?

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशीम : शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यवसायिक कारणांसाठी सर्रास गैरवापर होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र उघडपणे दिसून येत आहे. हॉटेल, ढाबे, चहाच्या टपऱ्या, बेकरी तसेच छोटे-मोठे खाद्य व्यवसाय चालविणारे अनेक जण घरगुती (सब्सिडी) सिलेंडरचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

नियमांनुसार घरगुती गॅस केवळ वैयक्तिक घरगुती वापरासाठीचं असून व्यवसायासाठी व्यावसायिक (कमर्शियल) सिलेंडर घेणे बंधनकारक आहे. मात्र कमर्शियल सिलेंडरचे दर जास्त असल्याने शहरातील काही व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून स्वस्त घरगुती सिलेंडर आपल्या दुकानामध्ये वापर करत असल्याचे दिसत आहे.

यामुळे महसुलाला सरळ फटका बसत आहे. घरगुती गॅसवर शासनाकडून दिली जाणारी सब्सिडी ही सर्वसामान्य कुटुंबांसाठी असते. तिचा व्यवसायासाठी वापर केल्यास शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसतो. यामुळे प्रामाणिक व्यावसायिकांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

संबंधित कंपन्या आणि प्रशासनाची भूमिका

एलपीजी वितरण करणाऱ्या कंपन्या जसे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या मार्फत सिलेंडर पुरवठा केला जातो. मात्र या गैरवापराबाबत कठोर कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

सदर प्रकाराची कारवाईची मागणी नागरिकांकडून अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवावी, दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि गैरवापर थांबवावा अशी मागणी होत आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर भविष्यात घरगुती गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT