Crime News  Pudhari
वाशिम

Washim Crime | जुन्या वादातून डोक्यात दगड घालून खून: संशयित ताब्यात

वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात

पुढारी वृत्तसेवा

Washim Murder Case

वाशिम : शहरातील पंचशील नगर परिसरात रविवारी (दि. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास खुनाची घटना घडली. राजू तुळशीराम कांबळे (वय 39, रा. पंचशील नगर, वाशिम) यांचा जुन्या वादातून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.

या प्रकरणी यश तोमर उर्फ ठाकूर (वय 20, रा. पंचशील नगर, वाशिम) याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी आरोपी यश ठाकूर याला तात्काळ ताब्यात घेतले.

या घटनेचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT