अजय ढवळे
वाशीम : शहरात एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना, दुसरीकडे वाशीम नगर परिषदेच्या धक्कादायक कारभारामुळे संतापाची लाट उसळली आहे. शहरातील कचरा डेपो परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला जाणूनबुजून दर वेळी आग लावण्यात आल्याचा गंभीर आरोप होत असून, ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासह टँकरद्वारे लाखो लिटर पाणी खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला. विषारी धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शहरात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि ढिसाळ नियोजन झाकण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे “स्वच्छ शहर”च्या घोषणा फक्त कागदावरच आहेत का? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहराच्या आरोग्याशी आणि पाण्यासारख्या मौल्यवान संसा