Limbalwadi Sugarcane Worker Family Aid Pudhari
वाशिम

Sugarcane Laborers Welfare | दिवंगत ऊसतोड कामगाराच्या वारसाला ५ लाखांचे अनुदान: लिंबाळवाडीतील लाभार्थ्यास धनादेश सुपूर्द

‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ’ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक मदत

पुढारी वृत्तसेवा

Washim Sugarcane Worker Family Aid

वाशिम : जिल्ह्यातील लिंबाळवाडी येथील दिवंगत ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला शासनाच्या सानुग्रह अनुदान योजनेतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ’ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दिवंगत विक्रम विलास लिंबोने (निधन १९ डिसेंबर २०२५) यांच्या वारसदार आई भाग्यवता विलास लिंबोने यांना ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्या आदेशानुसार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण यांच्या हस्ते हा धनादेश २० एप्रिल २०२६ रोजी सुपूर्द करण्यात आला.

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे आपत्तीग्रस्त कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी वाशिम तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून मदत वितरित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT