जप्त करण्यात आलेल्या अवैध देशी विदेशी दारुसह पोलिस. pudhari photo
वाशिम

Washim crime : अवैध देशी विदेशी दारु वाहतुकीवर धडक कारवाई

liquor smuggling: 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Illegal liquor transport

वाशिम : मंगरुळपीर शहरात दि. 17 मे रोजी जि.प.ग्राउंड जवळ शेलुबाजारकडे जाणाऱ्या रोडवर अवैध देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई नवदीप अग्रवाल (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम चार्ज मंगरुळपीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मंगरुळपीर शहरात जि.प.ग्राउंड जवळ शेलुबाजारकडे जाणाऱ्या रोडवर अवैध देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपी 1. विशाल श्रीराम शिवहरे वय 26 वर्षे रा.जयस्तंभ चौक कारंजा 2. गजानन टेकराव चौकशे रा.जयस्तंभ चौक कारंजा यांच्याकडून बोलेरो वाहन क्रमांक MH-40-BQ-5786 सह देशी विदेशी दारु किंमत 201220/- रुपये, बोलेरो वाहन व मोबाईल असा एकुण 10,11,220/- (दहा लाख अकरा हजार दोनशे वीस) रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारुचा पुरवठा करणारे रोहीत लुल्ला, वैभव (काल्या) , अनुप , भोला ,गोलु, तन्नु दिपक शिवहरे, मंगेश जाधव रा. पारवा , बाबु ठाकुर रा. मंगरुळपीर. दारु खरेदी करणारे , दारासिंग राठोड रा. भडशिवणी , गौतम रा.खडी धामणी , राम रा.कामरगांव , बाळु वैरागळे रा. खेर्डा , पिंटु किर्दक रा. काकडशिवणी , पुंडलीक पवार रा.भडशिवणी , प्रकाश वानखेडे रा.बांबर्डा , उमेश रा. मोखड पिंप्री , अंकुश रा. आखतवाडा , अतुल शिंदे रा.खेर्डा , उदयसिंग राठोड रा.विळेगांव , गुलाबराव तायडे रा. बांबर्डा , धिरज खराड रा. पोहा , संतोष रा. पोहा , गौतम इंगोले रा. पारवा कारंजा , सिध्दार्थ रा. चांधई ता. कारंजा यांच्यावर पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे गुन्हा नोंद करुन कार्यवाही केली आहे.

ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम अनुज तारे (IPS), लता फड अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाने नवदीप अग्रवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम यांच्यासह उविपोअ येथील कार्यालयीन स्टाफ सपोनि अतुल इंगोले, येथील पोहेकॉ रविंद्र कातखेडे पोकॉ अनंता डौलसे, पोकॉ सुमीत चव्हाण व उपविपोअ कार्यालय वाशिम येथील पोहेकॉ गणेश बाजड पोकॉ शंकर वाघमारे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT