Hotelier Death in Padmateerth lake
वाशिम: आजाराला कंटाळून तलावात उडी मारून हॉटेल व्यावसायिकाने जीवन संपविल्याची घटना वाशिम शहरातील पद्मतीर्थ तलावात आज (दि.२३) समोर आली आहे. हिंगोली नाका परिसरात राहणारे राधेसिंह ठाकूर (वय 56) असे मृताचे नाव आहे. त्याच्या जवळ स्वालिखित चिट्टी (सुसाईट नोट ) मिळाली असून आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये लिहिलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राधेसिंह ठाकूर हे हॉटेल व्यावसायिक असून मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. शुक्रवारी रात्रीपासून ते घरून निघून गेले होते. घरच्यांनी सर्वत्र त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज सकाळी पद्मतीर्थ तलावात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला आहे.