पीककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने काढली कुटुंबाची किडनी विकायला  pudhari photo
वाशिम

पीककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने काढली कुटुंबाची किडनी विकायला

वाशीम : पीककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने काढली कुटुंबाची किडनी विकायला

पुढारी वृत्तसेवा
अजय ढवळे

वाशीम : वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर अवयव विकायला काढले आहेत. इढोळे आज अवयवाचे दर लिहलेले फलक अंगावर लावून वाशिमच्या मुख बाजार पेठेत उभे होते. यावेळी 'बे भाव मानवी अवयव घ्या, मानवी अवयव घ्या.... अशा आरोळी दिल्या.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिलं होतं. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शक्य नसून शेतकऱ्यांनी कर्जाचा तात्काळ भरणा करावा असं वक्तव्य केलं होतं. यानंतर या शेतकऱ्याकडे विकण्यासाठी कोणताही शेतमाल शिल्लक नसल्याने कर्जाची रक्कम भरण्यासाठी त्याने अवयव विक्रीसाठी काढल्याच सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT