वाशिम

Washim district health news | वाशिम जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला मिळणार 'बूस्टर डोस'; ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३९ उपकेंद्रांना मंजुरी

आमदार भावना गवळी यांच्या पाठपुराव्याला यश; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सकारात्मकता

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा अधिक मजबूत करण्यासाठी आता मोठी पाऊले उचलली जात आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी आमदार भावनाताई गवळी पाटील यांनी केलेल्या आग्रही मागणीची दखल घेत, आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यात ६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३९ उपकेंद्रे सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

निती आयोगाच्या निकषानुसार विकासावर भर

वाशिम हा जिल्हा नीति आयोगाच्या ११२ मागास जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट आहे. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा जिल्हा मागे असल्याने येथे सार्वजनिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून आ. भावनाताई गवळी यांनी आरोग्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

येथे होणार नवीन आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे:

१. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (६) : मुंगळा (ता. मालेगाव), वाकद (ता. रिसोड), गिरोली व इंझोरी (ता. मानोरा), मानोली (ता. मंगरुळपीर) आणि वारा जहांगीर (ता. वाशिम).

२. प्रस्तावित आरोग्य उपकेंद्रे (३९) :

  • कारंजा तालुका: पिंपळगाव खुर्द, किन्ही, खानापूर, पसरणी, मांडवा, वाघोला, मोखड, यावर्डी.

  • मंगरुळपीर तालुका: शेगी, अंबापूर, दाभा, मोतसावंगा, पारवा, नांदखेडा, जनुना खुर्द, पिंप्री सुर्वे.

  • मानोरा तालुका: देवठाणा, मोहगव्हाण, म्हसणी, सावरगाव, हिवरा बु., आमकिन्ही, बोरव्हा बु., खापरदरी.

  • मालेगाव तालुका: एकांबा, धरमवाडी, अमानी, तिवळी.

  • रिसोड तालुका: आंचळ, पेनबोरी.

  • वाशिम तालुका: पंचाळा, सोनगव्हाण, जांभरुण नावजी, टो, काजळंबा, चिखली बु., जांभरुण महाली, सावंगा जहागीर आणि टनका.

"जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते, ज्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येचा विचार करता ही नवीन केंद्रे मंजूर होणे अत्यंत आवश्यक होते. लवकरच या केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचतील."
आ. भावनाताई गवळी पाटील

जुन्या केंद्रांच्या नूतनीकरणाचीही मागणी केवळ नवीन केंद्रे उभारून न थांबता, जिल्ह्यातील जुन्या आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या सोयी-सुविधांच्या अभावाकडेही आमदार गवळी यांनी लक्ष वेधले आहे. या केंद्रांसाठी आवश्यक आधुनिक साधनसामग्री आणि अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT