ST reservation demand
वाशिम : एसटी आरक्षणाच्या मागणी साठी जालना येथील अंबड चौफुली येथे १७ सप्टेंबर पासून दीपक बोऱ्हाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याच्या समर्थनार्थ राज्यभरातून धनगर समाजाने धरणे आंदोलन पुकारले आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
धनगर समाजाला तात्काळ एस.टी. प्रवर्गातील आरक्षण देण्यात यावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. २ दिवसांत दिपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास १ ऑक्टोबररोजी रस्त्यावर उतरून वाशिम जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पुढील आंदोलनाची दिशा दिपक बोऱ्हाडे सांगतील त्या पद्धतीने राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
यावेळी बालु मुरकुटे, किसनराव मस्के, ॲड. वैद्य, अरुण बोरकर, दिगंबर खोरणे, योगेश नप्ते पाटील, कविता खराट, नारायणराव लांभाडे, महादेव लांभाडे, विनोद मेरकर, डॉ. किशोर मुखामले, संतोष मस्के, माधवराव होडगीर, गणेश डाळ, शंकर पातळे, राधेश्याम कष्टे, शुभम मारकड, रंगराव मस्के, संतोष काळदाते, संतोष खोरणे यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.