वाशिम

Washim crime : बऱ्याच वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत आरोपी जेरबंद...

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : दीर्घ काळापासून पोलिसांच्या रडारवर असलेला सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

वाशिम जिल्ह्यातील पाहिजे/फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस जिल्हा अधीक्षक वाशिम यांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले. पोलीस स्टेशन रिसोड व इतर पोलीस स्टेशनच्या हददीत जबरी चोरी, दरोडा, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्हयांमध्ये आरोपी बाळू विठठल चव्हाण (वय ४० वर्षे, रा. वरूड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) हा पोलीस तपासात व न्यायालयीन प्रक्रियेत बऱ्याच वर्षांपासून पाहिजे / फरार होता.

तांत्रिक पध्दतीच्या माध्यमातून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकाने पोलीस स्टेशन डोणगाव हददीतील ग्राम विश्वी येथे सापळा रचून आरोपी बाळू विठठल चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले व पुढील कायदेशिर कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पोलीस स्टेशन रिसोड, जि. वाशिम यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई निकेश खाटमोडे-पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम, श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिक्षक, वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुधाकर आडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे नेतृत्वात पोउपनि सचिन गोखले, पोहवा/गजानन अवगळे, पोकों/अविनाश वाढे, दिपक घुगे, विठठल महाले, संदिप दुतोंडे, चालक पोकॉ/संदीप डाखोरे यांनी अथक परीश्रम घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT