Washim Crime 
वाशिम

Washim Crime | क्यूआर कोड स्कॅनरद्वारे अश्लील व्हिडीओ प्रसारित, पोलिसांकडून आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन वाशिम शहर यांची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : क्यूआर कोड स्कॅनरच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन वाशिम शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत संबंधित आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे अश्लील साहित्याच्या प्रसाराला आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

याबाबत अधिकच्या मिळालेल्या माहितीनुसार १७ सप्टेबररोजी रात्री ११.०० वा. चे सुमारास अज्ञात इसमांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या उददेशाने जय भवानी गणेश मंडळ येथील गणेश मुर्तीच्या पाटाला एक क्यु आर कोड स्कॅनर चिकटला, हा स्कॅनर स्कॅन केल्यावर त्याद्वारे अश्लिल व्हिडीओ सुरु होत असे. या प्रकारामुळे राम अर्जुन काळबांडे, रा. काळे फाईल, जि.वाशिम यांनी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे फिर्यादी दिली. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील अधिकारी व अंमलदारांना दिल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता सदर गुन्हयातील संयशित इसम दिसून आले. गुप्त बातमीदारांमार्फत त्यांचे नाव व राहण्याचे ठिकाण माहिती करून घेतले असता त्यांची नावे १) तन्मय शंकर मुठाळ, वय १९ वर्षे, रा. चिवरा, ता. मालेगाव, जि. वाशिम २) युगंधर मोहन अफुने, वय १८ वर्षे, रा. अंबिका नगर, लाखाळा, ता. जि. वाशिम ३) सुमित कैलाश भोने वय १८ वर्षे, रा. सावरगाव जिरे, ता.जि. वाशिम अशी असल्याची समजले. पोलिसांनी त्‍यांना वेगवेगळया ठिकाणाहून तात्काळ ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानंतर नमूद तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम रामकृष्ण पवार यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, स्थानिक गुन्हे शाखा, जि. वाशिम, पोलीस निरीक्षक संजय चौधरी, पो.स्टे. वाशिम शहर यांचे नेतृत्वाखाली सपोनि. जितेंद्र आडोळे, सपोनि सिता वाघमारे, पोउपनि. निलेश जाधव, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि. शेखर मास्कर, पोउपनि. रवि सैबेवार, स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे.वाशिम शहर येथील अंमलदार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT