वाशिम : जिल्हामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्या करीता पोलीस विभागाकडुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी वेळोवेळी अवैद्य दारु, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना वचक निर्माण केली आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा यांना वाशिम जिल्हा अंतर्गत पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम मोहगव्हाण येथील धरणाचे काठावर काही लोक गावठी हातभट्टी ची दारु गाळतात अशी खात्री लायक माहीती मिळाली. वरुन स्थानीक गन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मोहगव्हान येथे छापा टाकला.
याची कुणकुण लागताच. आरोपी घटनास्थळा वरुन पसार झाले. परीसराची पाहणी केली असता झाडझुडुपात लपवुन ठेवलेला तसेच जमिनीमध्ये गड्डा करुन पुरुन ठेवलेल्या सडवा मोहमाच चे 20 ड्रम 4 प्लास्टीकच्या टाक्या 20 पिपे असा 7 लाख रुपायांचा माल पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.
तसेच पोलीस स्टेशन वाशिम शहर, कारंजा शहर, येथे जुगार रेड करुन 10,820/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर विशाल क्षिरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनी शेखर मास्कर, बुध्दु रेघीवाले व स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या टिम ने अथक परीश्रम घेतले.