CCTV त दिसणारे चोरटे  
वाशिम

Washim Crime | ग्राहक असल्याचे भासवून भरदिवसा सराफा दुकानातून 5 लाखांच्या सोन्याची चोरी!

चोरटे सीसीटीव्हीत कैद, 30 ग्राम सोन्याचे दागिने हातोहात लंपास

Namdev Gharal

वाशीम : ग्राहक असल्याचे भासवून चोरट्याने दुकानात प्रवेश करत सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आला. सुरुवातीला त्याने विविध दागिन्यांची पाहणी करत दुकानदाराचा विश्वास संपादन केला. याच दरम्यान संधी साधून त्याने 30 ग्राम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. आणि कोणालाही संशय न येऊ देता तेथून पसार झाला.

घटना लक्षात येताच दुकानदाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून,दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसाढवळ्या होणाऱ्या अशा चोरीच्या प्रकारांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अशोक ज्वेलर्स काटी वेस वाशीम या दुकानात चलाखीने 30 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. एका चोरट्याने ग्राहक असल्याचे भासवत दुकानदाराकडे दागिने पाहण्याचा बहाणा केला. दागिने पाहताना त्याने दुकानदाराचे लक्ष विचलित करून संधी साधत 30 ग्रॅम सोने चोरून नेले. बाहेर दुचाकीवर त्याचा साथीदार तयार होता चोरी केल्यानंतर दोघेही तात्काळ पसार झाले दुकानदाराच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले होते.ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.वाशिम पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT