वाशिम

Washim Crime : खंडणीखोर हरिष सारडाला 'अंतरिम जामीन' मंजूर

संवेदनशील प्रकरणात आता ३० मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खंडणी गुन्ह्यातील आरोपी हरिष गोवर्धनदास सारडा याला वाशिम जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे सारडाला तूर्तास मोठा दिलासा मिळाला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३० मार्च रोजी होणार आहे.

न्यायालयाने या अर्जावर प्राथमिक सुनावणी घेत हरीश सारडा याला अंतरिम जामीन दिला असला, तरी या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू आहे. न्यायालयाने ३० मार्च ही तारीख निश्चित केली असून, त्या दिवशी संबंधित तपास अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. तपास अधिकाऱ्यांचा अहवाल आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, या अटकेबाबत किंवा जामिनाबाबत न्यायालय अंतिम निर्णय घेणार आहे. या संवेदनशील प्रकरणात आता ३० मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय असतो 'अंतरिम जामीन'?

'अंतरिम जामीन' (Interim Bail) म्हणजे एखाद्या आरोपीच्या नियमित जामीन अर्जावर अंतिम निर्णय येईपर्यंत न्यायालयाने दिलेला तात्पुरता दिलासा होय. जेव्हा नियमित जामिनावर सुनावणीसाठी वेळ लागतो किंवा दुसऱ्या बाजूचे (पोलिसांचे) म्हणणे ऐकून घेणे बाकी असते, तेव्हा आरोपीला अटक होऊ नये म्हणून ठराविक कालावधीसाठी हा जामीन दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT