वाशीम : जिल्ह्यात अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित वाहन जप्त केले असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक 12/04/2026 रोजी दोन ट्रकमधुन गोवंशाची वाहतुक होत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा वाशिम ला मिळाल्यावरुन सकाळी 05.30 च्या दरम्यान ग्राम कळंबा महाली, वाशिम मंगरुळपीर रोडवर सापळा रचुन संशयीत वाहन क्रमांक MH 04 FU 5246 व MH 44 440 यांना अडवुन तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबुन ठेवलेले गोंवश/बैल आढळुन आले. प्राण्यांना वाहतुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रे नसतांना वाहतुक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाई दरम्यान एकुन 30 बैल/गोवंश जनावरे तसेच 2 ट्रक वाहने असा एकुन अंदाजे 40,50,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी 1) सैय्यद अफजल सैय्यद सालार वय 29 वर्ष रा. रशीदनगर, दिवाणपुरा, मंगरुळपीर जि. वाशिम 2) नाजीमोद्दीन निजामोद्दीन वय 42 वर्ष रा. चहेलपुरा, मंगरुळपीर असे सांगितले वरुन संबधीत आरोपीतांविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी, सपोनि जगदीश बांगर स्थागुशा, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर स्थागुशा, वाशिम व टीम स्थागुशा ने अथक परिश्रम करुन केली आहे. जिल्हयात अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशी हालचालींबाबत त्वरीत पोलीसांना माहिती दयावी असे आवाहन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी केले आहे.