वाशिम

Washim BJP : कंत्राटी भरतीचे महापाप करणाऱ्या ‘मविआ’चा भाजपकडून निषेध

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात आज (दि.२१ ) भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष शाम बढे यांच्या नेतृत्वात 'सत्यमेव जयते' आंदोलन केले. यावेळी रेटून खोटं बोलणाऱ्या उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले. (Washim BJP)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असे म्हणून दोष देत नौटंकी करीत आहेत. कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेस व मविआने केलेले पाप आहे. भारतीय जनता जनता पार्टीने आज (दि.२१) जिल्हाध्यक्ष शाम बढे यांच्या नेतृत्वात पाटणी चौकात सत्यमेव जयते आंदोलन केले. (Washim BJP)

यावेळी कंत्राटी भरतीचे महापाप करणाऱ्या उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. आंदोलनाला जिल्हा महामंत्री नागेश घोपे, गजानन लाटे, मंडल अध्यक्ष संतोष शिंदे, प्रल्हाद गोरे, गजानन नवघरे, माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल भुतेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा माया वाघमारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळू मुरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल चौधरी,मिठुलाल शर्मा, गणेश खंडाळकर, सुनिल तापडिया, राहुल तुपसांडे, करूणाताई कल्ले, छाया पवार, रामेश्वर ठेंगडे, रामा इंगळे, रमेश नकले, राहुल शिंदे, कैलास मुगणकर, प्रशांत शिखरे,  उपस्थित होते.

ठाकरे माफी मागा !

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.

– शाम बढे, जिल्हाध्यक्ष भाजपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT