Uddhav Thackeray On Sanjay Deshmukh Shiv Sena Pudhari
वाशिम

Uddhav Thackeray | खा. संजय देशमुख मुलीच्या सोयरिकीचे कारण सांगून खोक्यांच्या बैठकीला गेले : उद्धव ठाकरे

वाशिम येथील सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray On Sanjay Deshmukh Shiv Sena

वाशिम : वाशिम येथील सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी, "फुटीर खासदार संजय देशमुख मुलीच्या सोयरिकीचे कारण सांगून खोक्यांच्या बैठकीला गेले," असा आरोप केला.

या वक्तव्यानंतर सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पक्षफोड, राजकीय घडामोडी आणि विरोधकांवरही टीका केली.

भाषणादरम्यान ठाकरे यांनी "मी मतदारांची माफी मागायला आलोय. माझ्याकडून चूक झाली," असे म्हणत जनतेसमोर आपली भूमिका मांडली. त्यांच्या या विधानानंतर सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला.

आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याकडे महत्त्वाच्या राजकीय संदेशाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. वाशीममधील सभेत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू असून, विरोधकांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT