वाशिम : ऋषभ ढवळे याने विभागस्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धेत ४०० पैकी ३७५ गुण घेऊन कांस्य पदक मिळवले. त्याची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो वाशिम रायफल क्लबचा राष्ट्रीय खेळाडू आणि श्री. स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज कोकलगावचा विध्यार्थी आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती जिल्हा क्रीडा परिषद अमरावती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती व अमरावती जिल्हा रायफल शुटींग असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ऋषभने आपल्या यशाचे श्रेय वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता, क्रीडा समव्यक किशोर बोन्डे, रायफल शूटिंग प्रशिक्षक प्रल्हाद आळणे, स्पर्धेचे आयोजक प्रशिक्षक राहुल उगले, विल्सन अमेर व आपल्या आई वडीलांना दिले.