Nitesh Rane 
वाशिम

Fishing News| दुष्काळात मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणेच मदत मिळणार : नितेश राणे

तलावातील गाळ काढण्याला प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

वाशीम: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकार मच्छीमारांच्या प्रश्नांवर अत्यंत गंभीर आहे. मच्छीमारीला कृषीचा दर्जा देण्यात आलेला असल्याने, दुष्काळी काळात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही योग्य तो न्याय देण्याची सरकारची स्पष्ट भूमिका आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. ते आज वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दौऱ्यादरम्यान मंत्री राणे यांनी स्थानिक मच्छीमारांची परिस्थिती प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी विविध तलावांना भेटी देऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. वाशीम जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असली तरी त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता आहे. सरकारच्या माध्यमातून मच्छीमारांना जास्तीत जास्त काय मदत करता येईल, याचा आढावा घेतला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी नियोजन करण्यात आलं असून, संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून महिनाभरानंतर गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, वर्षानुवर्षे तलावांमधील गाळ काढण्यात आलेला नाही. हा गाळ काढल्यास तलावांची पाणी साठवण क्षमता वाढून पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे हे काम प्राधान्याने हाती घ्यावे असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT