अजय ढवळे
वाशीम : वाशीम जिल्ह्यातील टो-जुमडा फाटा (दि. 16 फेब्रुवारी) दुपारी 12:30 वाजता वाशीम शिक्षण विभागाच्यावतीने भरारी पथकाने 12 वीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या दिवशी कर्तव्य पार पाडत 581 विधार्थी व 26 कर्मचारी यांच्यावर सामूहिक योग्य कारवाई केली. कर्तव्यदक्ष भरारी पथकाचा राज्य शासनाने विषय नोंद घेऊन त्यांचा शासकीय सन्मान करावा अशी मागणी राज्याचे राज्यमंत्री सुभोध सावजी यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आपल्या पत्रद्वारे मागणी केली आहे.
पत्रामध्ये असे नमूद केली की, इयत्ता बारावीच्या सामूहिक कॉपी प्रकरणावर कार्यवाही करणाऱ्या भरारी पथकाचे शासकीय स्तरावर मानसन्मान करावा. इयत्ता बारावी परीक्षेत ५८१ विद्यार्थ्यांवर वाशिम जिल्ह्यामध्ये श्री सेवागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा फाटा या परीक्षा केंद्रावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता भरारी पथकाने भेट दिली असता ५८१ विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना पकडले व या कॉपी प्रकरणात सहकार्य करणारे २६ कर्मचारी निलंबित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रामध्ये न भूतो न भविष्यती आपले राज्यात चालत असलेला भ्रष्टाचार यावर नसणारे नियंत्रण अशा परिस्थितीत ज्या भरारी पथकाने अशा मोठ्या भ्रष्टाचारास आळा घालण्याचा प्रयत्न केला या कारणाने या पथकाचा मान सन्मान शासन स्तरावर होणे आवश्यक आहे. माझी मागणी आपण मान्य करावी अशी अपेक्षा सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रातुन व्यक्त केली आहे.