वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याच प्रकारे शेतातील माती देखील खरडून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. एक प्रकारे शेतकरी या नैसर्गिक संकटामुळे पूर्णपणे हतबल झाला आहे. या संकटातून शेतकरी सुधारु शकत नाही मात्र त्याला काहीतरी आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यशासनाने शेतकर्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने म्हटले आहे की, वाशिम जिल्हा हा एक आकांक्षीत जिल्हा असून अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व शेतकर्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी याच प्रकारे ज्या शेतकर्यांची गुरे-ढोरे पावसाच्या पुरात वाहुन गेली. त्याचा मोबदला त्यांना मिळावा अशी मा गणी करण्यात आली आहे.
निवेदनावर रा.कॉ. जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे,पक्ष निरीक्षक प्रा. विश्वनाथ कांबळे, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे,महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई मेश्राम ज्योतीताई गणेशपूरे श्रीधर पाटील कानकिरड ,अमित पाटील खडसे, रायुकॉ जिल्हाध्यक्ष सुमित पाटील ,तालुका अध्यक्ष रमेश गोटे, कारंजा तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड, मानोरा तालुकाध्यक्ष काशिराम राठोड, रिसोड तालुकाध्यक्ष गजाननराव सरनाईक, मालेगाव तालुकाध्यक्ष भगवानराव शिंदे ,मंगरुळपीर तालुका अध्यक्ष बाळु पाटील टोपले, ओबीसी जिल्हाध्यक्ष मनिष चिपडे, युवक ता. अध्यक्ष माधव शेवाळे, कार्याध्यक्ष मुरलीधर जूनघरे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम कांबळे, .आदीवासी विभाग जिल्हाध्यक्ष विजय घोडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.जि.प्र.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिशावर जर अशा प्रकारे हल्ला केला जातो. तर देशात लोकशाही नसून हुकूमशाही आहे. असे स्पष्ट होते. असेही बैठकीत ठराव घेऊन या प्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली.