श्री पदमेश्वर संस्थान येथे होणार शिव-पार्वती विवाह सोहळा pudhari photo
वाशिम

Maha Shivratri 2025 : श्री पदमेश्वर संस्थान येथे होणार शिव-पार्वती विवाह सोहळा

श्री पदमेश्वर संस्थान येथे होणार शिव-पार्वती विवाह सोहळा

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : महाशिवरात्रीनिमित्त दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थानिक श्री पदमेश्वर संस्थान येथे भव्य शिव- पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त २५ तारखेला संध्याकाळी ७ वाजता महादेवाला हळद लावण्यात येईल.

तसेच २६ तारखेला महादेवाची श्री. पदमेश्वर संस्थान येथून सायंकाळी ६ वाजता वरात निघेल. ही वरात श्री. पदमेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री राम मंदिर येथून थेट श्री पदमेश्वर संस्थान येथे पोहचणार आहे. २६ तारखेला रात्री १२ : ०० वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

वाशिममध्ये भव्य प्रमाणात एवढा मोठा सोहळा श्री. पदमेश्वर आरती मंडळ साजरा करणार आहे. तरी वाशिमच्या सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन या सोहळ्याचे आयोजक श्री. पदमेश्वर आरती मंडळ, श्री. पदमेश्वर संस्थान, वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT