वाशीम : वाशिम जिल्हयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्या वतीने कोम्बिंग गस्त व नाकाबंदी करण्यात आली होती. मालमत्ता विरुध्द घडणाऱ्या गुन्हयांस प्रतिबंध होण्याकरीता व खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणे अत्यंत आवश्यक असल्याने तसेच 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यत दिवाळी सण साजरा होत असल्याने कोम्बिंग, नाकाबंदी करण्यात येणार आहे.
संपुर्ण वाशिम जिल्हयात 26 ऑक्टोबर ते 27ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम अनुज तारे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबीग गस्त व नाकाबंदी करण्यात आली होती.
नाकाबंदीसाठी वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा मिळुन 34 अधिकारी व 128 अंमलदार नेमण्यात आले होते. कोबींग गस्त दरम्यान आर्म अॅक्टच्या 5 केसेस करुन 5 आरोपी जेरबंद करण्यात आले. रेकॉर्ड वरील 50 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 31 झोपडपट्टयांचीही यावेळी तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार 25 केसेस करण्यात येऊन 25 आरोपीकडुन 2,35,060 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र जुगार कायदया अंतर्गत 4 केसेस करण्यात येऊन 12 आरोपीकडुन 86,180 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नाकाबंदी दरम्यान 465 वाहनांची कसुन तपासणी करुन 30 वाहनांवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.