वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांच्या पुतळ्यास दि.19 जून रोजी जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी कारंजा शहरातील झाशी राणी चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने खासदार संजय देशमुख यांनी उबाटा पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिसर घोषणांनी दणाणून गेला होता मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या पक्षाची बेइमानी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
या गद्दाराचे करायचे काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या पक्षाची बेइमानी करणाऱ्या संजय देशमुख यांनी पक्षाच्या विचारधारेची प्रस्तावना केल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्याने त्यांनी सांगितले पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला यावेळी काही काळ झाशी राणी चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलीस प्रशासनाने घटनास्थळी बंदोबस्त करण्यात केला होता आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पक्ष निष्ठा जपण्याचे आवाहन केले लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याने त्यांनी स्पष्ट केले पक्ष सोडणाऱ्या नेत्याविरोधात जनतेनी नाराजी असल्याचा दावा यावेळी करण्यात आला कारंजा शहरातील या आंदोलना ची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे आगामी काळात अशाच प्रकारचे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला
यावेळी आंदोलनामुळे कारंजा शहरातील राजकीय वातावरणात चांगलेच तापले असलेले चित्र पाहायला मिळत आहे या आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास सुरळकर उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक शहरप्रमुख राजू पाटील ठाकरे विलास कडू जगदीश थेर प्रिया महाजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मनोज पाटील कानकिरड कारंजा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील रोकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे शहराध्यक्ष अब्दुल राजीक काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया व इतर शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात त सहभागी झाले होते.