वाशीम : शासनाच्या मंजुरीविना वापरले जाणारे HTBT प्रकारचे बियाणे अवैधपणे राज्यात आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उघड झाला आहे. धुळे जिल्ह्यात, यामहाराष्ट्रात प्रवेश करत असताना एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर अशा संशयित बियाण्यांचा साठा पकडण्यात आला. सदर प्रकरणात संबंधित व्यक्तीला मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशिम जिल्ह्यातील शिवणी दलेरपूर गावातील माऊली कृषी सेवा केंद्रामध्ये छापा टाकण्यात आला. मात्र कृषी केंद्र चालक गैरहजर असल्याने त्याचं दुकान सील करण्यात आले आहे.
या कारवाईत माउली कृषी सेवा केंद्र या दुकानावर धाड टाकण्यात आली. हे दुकान धुळे जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या भावाचे असल्याची माहिती आहे. मात्र, छापेमारीच्या वेळी दुकान व गोदामाला कुलूप लावून संबंधित संचालक फरार झाल्याचे आढळले. या केंद्रावर इतर राज्यांतून अवैध STBT बीज आणून महाराष्ट्रात वितरित केल्याचा आरोप आहे.
या कारवाईत संबंधित कृषी केंद्र चालकाचा मुलगा आणि त्याचा भाऊ यांच्या ताब्यातून एकूण 208 बियाण्याची पाकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. यापैकी 8 पाकिटांचे नमुने प्रयोगशाळेसाठी घेण्यात आले आहेत. हे बियाणे शासनमान्य नसून, त्याचा वापर पर्यावरण संरक्षण कायदा व विविध कृषी संबंधित कायद्यांचे उल्लंघन करणारा आहे.
सदर प्रकरणात 8 ते 9 कायद्यांअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असून, उद्या सकाळपर्यंत संबंधितांवर कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल, असे अधिकृत अभिजीत देवगीरकर कृषी विकास अधिकारी यांनी सांगितले आहे. शासन अशा अवैध बियाण्यांच्या प्रसारावर कडक पावले उचलत आहे.