Haribhau Rathod
वाशीम : बंजारा, भटके विमुक्त आणि ओबीसींचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना झाडू मारण्याची शिक्षा मिळाली आहे. उपहिंदू म्हणून जगण्याच वक्तव्य हरिभाऊ यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना बंजारा धर्मपीठाने सेवालाल महाराजांच्या मंदिरात झाडू मारण्याची शिक्षा दिली आहे.
"बंजारा धर्म आहे. आता आम्ही हिंदू म्हणून नाही तर उपहिंदू म्हणून जगू. मानवाला जे अधिकार मिळायला हवे ते हिंदू देऊ शकणार नाही," असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले होते. यावर संत सेवालाल महाराजांच्या पाचव्या पिढीच्या वंशजांनी बंजारा धर्मपीठामार्फत हरिभाऊ यांना पोहरादेवी येथे सेवालाल महाराजांच्या मंदिरात झाडू मारण्याची शिक्षा दिली आहे. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत मानले जातात.