वाशिम : सध्या विविध जाचक शासन नियमाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्याचा शासनाचा डाव आहे, हा डाव हाणून पाडण्यासाठी शिक्षकांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते दिलीप कडू यांनी केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने वाशिम जिल्ह्यात शिक्षक संपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दिलीप कडू यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर मार्गदर्शन केले.
शिक्षकांना टि. ई.टी. बंधनकारक करणे,चुकीच्या संचमान्यता करणे, शिकवण्याऐवजी तांत्रिक कामात अडकवून ठेवणे, बिएलओच्या ड्युटी लावने यासह शेकडो जाचक शासन निर्णय काढुन हजारो शिक्षकांवर अतिरिक्त ठरवुन अनुदानित शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र रचल्या जात मात्र विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही असे आश्वासन कडू यांनी दिले.
या संपर्क दौर्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह प्रा. बाळासाहेब गोटे, महामंडळाचे सदस्य विनायक उज्जैनकर, वाशिम जिल्हा अध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा कार्यवाह कुलदिप बदर, प्रसिद्धी प्रमुख सुनिल कोंगे,उपाध्यक्ष बबनराव ठाकरे, मंगेश भोरे, डि. एन. पाटील, गजानन इढोळे, नंदकिशोर नवरे, विज्युक्टाचे सचिव प्रा. शंकर लहाने, मास्टर संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष गडेकर, शिक्षकेतर संघाचे नेते अविनाश पसारकर यांचेसह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.