Flooding of rivers and canals due to heavy rains
मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर  Pudhari Photo
वाशिम

वाशिम : मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर

पुढारी वृत्तसेवा

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यामध्ये रविवारी (दि.14) मुसळधार पाऊस झाला. सकाळ पासूनच सतत पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील लेंढी नदीला पूर आला असून एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाशिम राजाकिंही मार्ग मागील दोन तासांपासून बंद झाला होता. पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहनाची रांगा लागल्या आहेत..

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, यात अडाण नदीला पूर आल्याने या नदी काठच्या एरंडा, बोराळा, किनखेडा येथील शेत जमीन पाण्याखाली आल्या आहेत, त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होत शेत जमीन खरडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर अद्यापही पाऊस कमी न झाल्याने रात्रभर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

SCROLL FOR NEXT