नकली नोटा बनवणारी टोळी जेरबंद Pudhari Photo
वाशिम

वाशिम : नकली नोटा बनवणारी टोळी जेरबंद

नोटा बनवण्याचे साहित्य तसेच 1 लाख 78 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त

करण शिंदे

वाशिममध्ये फर्जी स्टाईल एक टोळी नकली नोटा छापणाऱ्या टोळीला मंगरुळपीर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना गुरुवारी (दि.8) घडली. यामध्ये पोलिसांनी कारवाई करुन 1 लाख 78 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. या सोबतच नकली नोटा तयार करण्याचे साहित्यसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांना सुत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली की, एका चारचाकीमधून (क्रमांक एमएच 30 एएफ 1082) मध्ये तीन लोक नकली चलनी नोटा बनविण्याकरीता लागणारे साहित्य नांदेडवरुन घेवून येत आहे. या माहितीवरुन पथक नाकाबंदी करत संबधित वाहणास थांबविण्याचा इशारा केला होता. वाहन न थांबल्यामुळे त्याचा पाठलाग करुन आरोपींवर कारवाई केली. यावेळी शिवाजी साहेबराव खराडे (वय.53 रा शिवाजी नगर कारंजा) शेख जावेद शेख लालन (वय. 44 रा मस्जीदपुरा कारंजा) शेर खान मेहबुब खान (वय. 46 रा मोती मस्जीद काझीपूरा कारंजा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाई अनुज तारे जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम, भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, श्रीमती निलीमा आरज उपविभागिय पोलीस अधीकारी मंगरुळपीर, पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / शिवचरण डोंगरे, पो.उप.निदिनकर राठोड, पो.उप.नि राम ढगे, मो.हे.कॉ संजय घाटोळे, पो.कॉ जितेंद्र ठाकरे, पो.कॉ माळकर, पो.कॉ रफीक, पो.कॉ येळणे, चालक उमेश ठाकरे यांनी पार पाडली आहे. तरी वाशिम जिल्हा पोलीस दला मार्फत जनतेला आवाहण करण्यात येते की, कोणीही अशा आमीषाळा बळी पडू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT