File Photo
वाशिम

दारूच्या नशेत एका युवकाकडून तीघांवर चाकू हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक

Washim Crime News | जखमींवर सामान्य रुग्‍णालयात उपचार

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : वाशिमच्या ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या साबू हॉस्पिटल समोर दारूच्या नशेत असलेल्या युवकानं तिघांवर चाकूनं वार केले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी असलेल्या तिघांना सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

या परिसरात एक लहान मुलगा खेळत असताना एक तरुण दारूच्या नशेत आला आणि त्या मुलाला मारहाण करत होता. त्या लहान मुलाचे वडील आणि इतर काही जण दारूच्या निशेत असलेल्या तरुणाला समजावण्यासाठी गेले असता त्याने चाकू काढून थेट त्यांच्यावर वार केले. यात दोघांच्या गळ्यावर चाकू लागला असून एकाच्या पाठीवर आणि इतर भागात खोल जखमा झाल्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT