वाशीम : विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर गवळी समर्थकांनी वाशिमच्या पाटणी चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.
भावना गवळी यांची लोकसभेची उमेदवारी कापली होती, त्यावेळी गवळी यांना राजकीय पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. ते आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळीत भावना गवळी यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. गवळी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेला विदर्भासह वाशिम जिल्ह्यात बळ मिळणार असून शिवसेना वाढीसाठी याचा फायदा होणार आहे. गवळी यांना विधानपरिषदवर घेत पुन्हा त्यांना महिला व सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.