Petrol and Diesel Shortage : वाशिम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई? कॅनसह पंपावर रांगा file photo
वाशिम

Petrol and Diesel Shortage : वाशिम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई? कॅनसह पंपावर रांगा

कॅन व बॉटलमध्ये पेट्रोल- डिझेल देण्यास तात्काळ बंदीची मागणी..

पुढारी वृत्तसेवा

Artificial Shortage of Petrol and Diesel in Washim District? Queues at Pumps with Cans

वाशिम : अजय ढवळे

डिझेल, पेट्रोल कॅनमध्ये साठवून ठेवण्याच्या वाढत्या प्रकारामुळे सद्या वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. अफवा आणि भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात कॅन घेऊन पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना इंधन मिळण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

त्याच बरोबर दररोज अनेक पेट्रोल पंपावर हाणामारीच्या घटना घडत आहेत. परिणामी या बाबींवर प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व कॅन, बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास तात्काळ बंदी घालावी अशी मागणी जोर धरत आहे.

फक्त वाशीम जिल्ह्यांमध्येचं कॅन घेऊन इंधन भरणाऱ्यांच्या रांगा लागल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पंपांवर हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत बाटली व कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात इंधन टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांकडून पेट्रोल-डिझेलचा साठा करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक जण कॅन, बाटल्या घेऊन पेट्रोल पंपांवर पोहोचत असल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी शेतकरी, गरजू वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कॅनमध्ये डिझेल व पेट्रोल देण्यास बंदी घालावी अशी मागणी समोर येत आहे.

दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तासन्तास उभारूनही डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी पेट्रोल पंपावर कॅन घेउन रांगा लावल्याचे दिसून येत असल्याने वाहनधारकांना वाहनात इंधन भरताना वेळ लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT