मुख्य अभियंता राजेश नाईक वीज बिल वसुली मोहिमेत सहभागी होऊन कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढवत आहे Pudhari
वाशिम

Akola Mahavitaran | अकोला परिमंडळाअंतर्गत अडीच हजार पाणी पुरवठा योजनांकडे १६० कोटी थकीत: बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित

महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल १५९ कोटी ८५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत

पुढारी वृत्तसेवा

Washim public water supply schemes electricity bill

वाशिम : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल १५९ कोटी ८५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे. वसूलीसाठी महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो.

महावितरणचे अस्तित्वच वीज बिलाच्या शंभर टक्के वसूलीवर आहे. मार्च महिन्याचे आर्थिक महत्व लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.

महावितरणकडून थकबाकी वसूलीसाठी संबंधित विभागाशी वारंवार संपर्क करण्यात आला. प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार, स्मरणपत्रे आणि मोबाईल संदेशाच्या माध्यमातून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई अपरिहार्य ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि कारवाईसाठी तसे निर्देशही क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले.

परिमंडळात एकूण २ हजार ६८६ नळ योजना थकबाकीदार असून, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६९९ योजनांकडे ३३ कोटी २५ लाख, बुलडाणा जिल्ह्यातील १ हजार ४९० योजनांकडे १०७ कोटी ९१ लाख आणि वाशिम जिल्ह्यातील ४९७ योजनांकडे १८ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने महावितरणने वसूली मोहिमेला अधिक गती दिली आहे. या मोहिमेत महावितरणच्या सर्वच वर्गवारीतील थकबाकीदार वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे .तसेच या मोहिमेत सर्व स्तरांतील अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभागी झाले असून थकबाकीदार ग्राहकांकडे थेट भेट देऊन वसुलीची कारवाई केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT