विनापरवाना देशीदारुच्या 40 बॉक्ससह वाहनावर कारवाई Pudhari Photo
वाशिम

विनापरवाना देशीदारुच्या 40 बॉक्ससह वाहनावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : वाशिम शहरामध्ये डीबी पथकाने धडक कारवाई करत विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनासह देशीदारुचे 40 बॉक्स जप्त केले आहेत. हा एकूण मुद्देमाल हा 2 लाख 65 हजाराचा असल्य़ाचे पोलिसांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती अशी की, वाशिम शहर पोलिसांना सुत्राकडून माहिती प्राप्त झाली की, अकोला नाका ते पुसद नाका या रोडने एका लाल रंगाची व्हॅन देशी दारुचे बॉक्स घेवून जाणार आहे. यासाठी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील डी. बी. पथकाने पोस्ट ऑफीस चौक येथे मंगळवारी (दि.१५) रात्री नाकाबंदी केली. या दरम्यान लाल रंगाची व्हॅन येत असल्याचे दिसुन आल्याने सदरची व्हॅन थांबवुन व्हॅनची पाहणी केली. तेव्हा त्यामध्ये देशी दारु चे बॉक्स आढळुन आले. यावेळीवाहन चे चालकास त्याचे माहिती विचारली असता त्याने त्यांचे नांव पंकज शिंदे (रा. शुक्रवार पेठ वाशिम) असे सांगितले.

यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या दारुच्या परवान्याबद्दल विचारले असता, त्याकडे कोणताही पुरावा आढळून आला नाही. सदरचा माल हा बस स्टॅन्ड वाशिम जवळील देशी दारुचे दुकानामधुन घेवुन अनसिंग भागात विक्री करीता घेवुन जात असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी एक लाल रंगाची व्हॅन क्रमांक (MH २७ D- १३०९) व त्यामधील देशी दारुचे ४० बॉक्स असा एकुण २,६५,०००/-रु.चा माल जप्त करुन वाहन चालक व देशी दारुचे दुकान चालकावर पो.स्टे. वाशिम शहर येथे नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन देशी दारुचे दुकानावर कडक कार्यवाही करण्या करिता संबधीत विभागास पत्रव्यवहार करण्यात येत आहे. सरदची कॅफे चेकींग विशेष मोहिम ही जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. लता फड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर,पोउपनि.निलेश जाधव, एएस आय,कैलास कोकाटे, पोहेकॉ. लालमणी श्रीवास्तव, पोहेकॉ. प्रशांत वाढणकर, पोहेकॉ. शैलेंद्रसिंह ठाकुर, पोकॉ. उमेश देशमुख, पोकॉ. महादेव भिमटे, पोकॉ. संदिप दुतोंडे, पोकॉ. कोरडे व त्याचे पथकाने केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT