वर्धा : आर्वी येथे युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी ४ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सलीम सबदर शहा (वय ३५) रा. आर्वी असे मृतकाचे नाव आहे. निखिल बुरे रा. हरदोली असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले. सलीम शहा आणि निखिल बुरे या दोघांत प्रेम प्रकरणातून वाद झाल्याची माहिती कळते. या वादातून निखिल बुरे याने सलिम शहा याच्यावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सलीम शहा याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने आरोपीस ताब्यात घेतले. याप्रकरणी आर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.